सोलापूर – क्रीडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, सोलापूरचे शिक्षक पवन राजेश भोसले यांची ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे.
स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन, नाशिक आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा व शैक्षणिक कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता जीवक स्कूल ऑफ नर्सिंग, भाग्यलक्ष्मी कॉम्प्लेक्स, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे होणार आहे. पवन भोसले यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, या सन्मानामुळे सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


















