सोलापूर – शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा यंदाचा येथील बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी जाहीर केले.
शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.बलिदान चौक येथील जैन स्थानकात परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.इंडियन मॉडेल स्कूलच्या सौ.सायली जोशी यांच्या हस्ते व स्थायी समिती सभापती सौ.रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे, नगरसेवक अनंत जाधव,राजू भुमकर,बाळासाहेब वाघमारे, चंद्रकांत वानकर,डॉ.संध्या रघोजी, राजशेखर हिरेहब्बू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे-प्रा. प्रशांत शिंपी (संगमेश्वर कॉलेज),सौ. संगीता पाटील (एस व्ही सी एस हायस्कूल भवानी पेठ), सौ.लता सूर्यवंशी-कांबळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारंबा), संतोषी जाधव (सहस्त्रार्जून प्रशाला),पल्लवी दोड्डी(श्रीमती लक्ष्मीबाई मिठ्ठा बालक मंदिर),सौ. पुनम कटकधोंड(सेंट जोसेफ हायस्कूल), सौ.योगिता पवार (दमाणी प्राथमिक विद्यामंदिर), सुजाता खेडगीकर(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडातांडा), सौ. गौरी देशमुखे-उपासे (अधीक्षक रिमांड होम), बाबागौडा बिराजदार एस.के.बिराजदार प्रशाला), उमेश युवनाती (महानगरपालिका शाळा देशमुख वस्ती देगाव), कृष्णकांत उपाध्ये (श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक शाळा), विरेश थळंगे (शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वळसंग), सुषमा वाघमोडे (श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा कुंभारी), भाऊसाहेब भोसले (कै.सौ.शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय बार्शी), सौ.शीला हावळे (बलदवा हायस्कूल देगाव), सौ.व्ही.आर गवळी (बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल), नौशाद सोफी (शास्त्रीनगर उर्दू प्रायमरी स्कूल), चंद्रकांत आदलिंगे (वि.मो.मेहता प्रशाला), प्रा.प्रसन्न नाझरे (अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय),खाशेराव ढोले (एरिया सेल्स मॅनेजर नवनीत एज्युकेशन) *शिक्षकेतर कर्मचारी*-सलीम पटेल (आसावा प्रशाला), सचिन सोनवणे(दयानंद महाविद्यालय) *उपक्रमशील शाळा*- लोकमंगल माध्यमिक प्रशाला अवंती नगर, श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला, गांधीनाथा रंगजी मराठी प्राथमिक विभाग बाळीवेस, श्री वीर तपस्वी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळा भवानी पेठ, चांदतारा उर्दू प्रायमरी स्कूल.
Post Views: 53