Monday, October 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्नशील : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

तरुण भारतbyतरुण भारत
August 30, 2026
in solapur
0
सोलापुरात क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्नशील : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – सोलापुरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी क्रीडा हॉस्टेलची गरज आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेमार्फत हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिले. समृद्धी कीडा सेवा पुरस्काराबरोबर  ५० राष्ट्रीय खेळाडूंना ट्रॅक सूट वाटप  करणाऱ्या समृद्धी स्पोर्टस क्लबचे कार्य खूपच  कौतुकास्पद आहे, असे उदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुजय शिंदे यांनी काढले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्टस्‌‍ क्लबच्या वतीने  समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार वितरण प्रसंगी उपमहापौर देवकर  बोलत होत्या. याचाच धागा पकडून महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले, क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी महापालिकेमार्फत राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे यापूर्वी ८ कोटी ९२ लाखाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. तो प्रलंबित आहे, यासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
——
प्रत्येक वर्षी पुरस्काराच्या रकमेत एक हजाराची वाढ करणार : संजय सावंत
सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक संजय सावंत यांनी यावेळी सांगितले. खेळाडूसाठी यंदा या पुरस्काराच्या रकमेत 1000 रुपयाची वाढ करण्यात आली असून प्रत्येक वर्षी एक हजाराची  वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
———————
 समृद्धीच्या कार्यासाठी राजीव देसाई यांची देणगी
यंदाच्या या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. पुरुष व महिला खेळाडूंना प्रत्येकी 3100 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल तर संघटक आणि प्रशिक्षक यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल या पुरस्काराने गौरविण्यात आले. रामजी कश्यप (खो-खो)व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी (डायव्हिंग) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तर आंतरराष्ट्रीय डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेटे व लॉन टेनिसचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटक राजीव देसाई यांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राजीव देसाई यांनी समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यासाठी  5001 रुपयाची देणगी जाहीर केली.
————–
 हे पुरस्कार  सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय  शिंदे महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल असोसिएशनचे सचिव निखिल शेडगे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे, शिक्षक नेते संजय चेळेकर,वीरभद्र यादवाड, नगरसेवक विनोद भोसले व सात्विक बडवे, अक्षय वाकसे, शैलेश राज,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते अमजद जेलर, चंद्रकांत होळकर, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी, उपाध्यक्ष अंबादास पांढरे,हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष  सुदेश मालप, उद्योजक ज्योतिबा गुंड, ॲड. बसवराज सलगर, समृद्धी बचत गटाचे अध्यक्ष अविनाश गोडसे,समृद्धी कला मंच अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण, सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू, शुटिंग बॉल असो सचिव फैज अहमद बेगमपूरे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य अजितकुमार संगवे, सत्येन जाधव व गणेश पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे माजी सभापती संजय नाना शिंदे होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर, डॉ. सातपुते, क्रीडा शिक्षक मारुती घोडके व सोनाली भोसले यांना समृद्धी क्लबचे सदस्यत्व देण्यात आले.  यावेळी  जेष्ठ पत्रकार अजितकुमार संगवे,अमीर काझी, रेणुका बुधराम, पुंडलिक कलखांबकर  यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धी स्पोर्टस क्लबचे उपाध्यक्ष प्राचार्य अंबादास पांढरे यांनी केले. तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.  मल्हारी बनसोडे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.डी. राठोड, शोएब बेगमपूरे, सुरेश भोसले, संतोष जाधव,पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले, श्रीमंत कोळी, शाहनवाज मुल्ला, शिवाजी वसपटे, प्रमोद कुरकुळळी, व्यंकाप्पा शेंडगे, संजय बनसोडे, हिरा पवार यांनी  प्रयत्न केले.
Post Views: 118
Previous Post

बसवेश्वर विचार मंचचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

माळशिरस तालुक्यात दमदार पावसाची गरज; खरीप वाया, भिस्त आता रब्बीवर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माळशिरस तालुक्यात दमदार पावसाची गरज; खरीप वाया, भिस्त आता रब्बीवर

ताज्या बातम्या

धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

October 25, 2026

दिवाळी सुट्टी तोंडावर; विद्यार्थ्यांच्या कृतिपत्रिका अद्याप रखडल्या!

October 25, 2026

दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय उपाययोजनांसाठी सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषद

October 25, 2026
ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

October 25, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

October 25, 2026
निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

October 25, 2026

दुष्काळाच्या झळा आठवडी बाजारालाही; बार्शीच्या बाजारपेठेत शुकशुकाट

October 25, 2026

कांदा पिकातील स्प्रिंकलरचे साहित्य चोरीला, चोरट्याने सुमारे ४ हजार ८०० रुपयांचे साहित्य पळविले

October 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1415954

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!