सोलापूर : जुळे सोलापूर भागातील प्रारंभ प्रारंभ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
या निमित्ताने प्रारंभ प्रतिष्ठानच्या ढोलपथकातील मुलींनी आपल्या पथकातील मुलांना राख्या बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते जपले. यावेळी प्रारंभ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका व प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका सौ. संगीता जाधव यांच्या हस्ते शिवपूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ढोल ताशा प्रमुख आकाश जाधव यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. नगरसेविका सौ संगीता जाधव यांनी रक्षाबंधन या पवित्र सणाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. याप्रसंगी प्रारंभ प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकातील सर्व सदस्य, त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.























