स्वीकृत सदस्य निवडीत भाजपचे पारडे जड; ‘आठ’चा दबाव वाढणार!

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्य निवडीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मिनी मंत्रालयातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवड कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता असून, ६८ सदस्यांच्या सभागृहात संख्याबळाच्या जोरावर भाजपचे पारडे सध्या सर्वाधिक जड दिसत आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ सेनेचे आठ सदस्य, तसेच स्वतंत्र गटातील सहा सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने निवड बिनविरोध होण्याऐवजी राजकीय रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
दहा सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य या प्रमाणात जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. भाजपकडे सर्वाधिक ३८ सदस्य असल्याने त्यांच्या वाट्याला चार स्वीकृत सदस्य येऊ शकतात. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे दहा सदस्य असल्याने त्यांना एक सदस्य मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागेसाठी मात्र राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सहा सदस्य आहेत. त्याचवेळी आमदार नारायण पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचा स्वतंत्र गट आहे. या गटात सांगोला शेकाप आघाडीचे तीन, करमाळा तालुका आघाडीचे दोन आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीचा एक सदस्य आहे. या सहा सदस्यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादीशी जुळवाजुळव झाली, तर स्वीकृत सदस्य निवडीतील समीकरणच बदलू शकते. मात्र विधान परिषद निवडणुकीवेळी आमदार नारायण पाटील आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भूमिका भाजपला पूरक राहिल्याने आता स्वीकृत सदस्य निवडीत हे दोन्ही आमदार आणि भगीरथ भालके कोणाच्या बाजूने उभे राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
स्वीकृत सदस्य निवडीत केवळ पक्षीय विचारसरणीपेक्षा विकास निधी आणि आगामी राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहून मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळवण्याचे राजकीय गणित या निवडीत प्रभावी ठरू शकते. त्यामुळे स्वतंत्र गटातील सहा सदस्यांची भूमिका शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पष्ट होईलच, असे चित्र नाही.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ सेनेकडे जिल्हा परिषदेत आठ सदस्य आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमताच्या दिशेने जाणारे संख्याबळ असले तरी स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने एकनाथ सेना आपल्या राजकीय वाट्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मित्रपक्षाला विश्वासात घेऊनच पुढील राजकीय डावपेच आखावे लागणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण आपल्या बाजूने ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून पडद्यामागील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
भाजपचे ३८, अजित पवार गटाचे १० आणि एकनाथ सेनेचे आठ सदस्य असे सत्ताधारी आघाडीतील संख्याबळ आहे. दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सहा आणि स्वतंत्र गटातील सहा सदस्य अशी विरोधक व अपक्षीय राजकीय ताकद आहे. त्यामुळे संख्याबळ भाजपच्या बाजूने असले तरी उर्वरित सदस्यांची भूमिका स्वीकृत सदस्य निवडीच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची ठरणार आहे.
एकंदर, अधिसूचनेनंतर आता निवड कार्यक्रमाची प्रतीक्षा असून, कार्यक्रम जाहीर होताच मिनी मंत्रालयातील राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. भाजपचे संख्याबळ मजबूत असले तरी मित्रपक्षाचा दबाव आणि स्वतंत्र गटाची भूमिका यामुळे स्वीकृत सदस्य निवडीत अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय ट्विस्ट कायम राहण्याची शक्यता आहे.
चौकट
जिल्हा परिषदेत पक्षनिहाय बलाबल
पक्ष/गट| सदस्यसंख्या
भारतीय जनता पक्ष| ३८
राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट| १०
एकनाथ सेना| ८
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष| ६
सांगोला शेकाप आघाडी| ३
करमाळा तालुका आघाडी| २
पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडी| १
एकूण| ६८

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!