सोलापूर – येथील शि.प्र.मंडळी पुणे संचलित एस.पी.एम. इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाई देवकरण प्रशालेचे व महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.प्रमोद चुंगे व प्रकाश कंपली उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व, नियमित व्यायामाचे फायदे तसेच खेळामुळे होणारा शारीरिक व मानसिक विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “खेळेल भारत, जिंकेल भारत”
“खेळा, तंदुरुस्त राहा आणि देशाला गौरव मिळवून द्या!”
2026 च्या या आशयावर आधारित कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी विविध क्रीडसहित्याची पूजा करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना “खेळ हा केवळ स्पर्धेचा भाग नसून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे प्रभावी माध्यम आहे,” असा संदेश देण्यात आला.
प्राचार्या संगीता कोळी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व देण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे चुंगे सर व कंपली सर यांनी विद्यार्थ्यांना खेळातील सातत्य, मेहनत आणि खिलाडूवृत्ती,शरीर हीच खरी संपत्ती आहे. यांचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावीची विद्यार्थिनी गार्गी कामठाणकर हिने केले.
Post Views: 10