जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केडगाव येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व जपत रक्षाबंधनाचा आनंद घेतला.
शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेमाने राख्या बांधल्या. तसेच भावांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून प्रेम, स्नेह, बंधुभाव आणि परस्पर जिव्हाळा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याची जाणीव करून देणारा हा उपक्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला
Post Views: 17