जालना : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ पंडागळे,
जालना जिल्ह्याचे नेते आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या आदेशानुसार शिवसेना
दलित आघाडीच्या जालना जिल्हा कार्यकारणीसह जिल्ह्यातील तालुका व शहर
कार्यकारणीतील पदाधिकार्यांच्या नियुत्तäया करण्यात आली असल्याची माहिती
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे आयोजित केलेल्या
बैठकीत दिली.
शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांच्या
अध्यक्षतेखाली या नियुत्तäया जाहीर करण्यात आल्या. या माध्यमातून
जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला
आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांनी शिवसेनेची ध्येय-धोरणे व विचारधारा
तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी सक्रियपणे
कार्य करावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अॅड. भास्करराव मगरे यांनी केले.
जिल्हा कार्यकारणीत जिल्हा सचिवपदी जय खरात, तर जिल्हा कोषाध्यक्षपदी
भगवान लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाप्रमुखपदी
अण्णासाहेब बाळराज, बाळासाहेब बदर्गे, दशरथ तांबे, प्रल्हाद साळवे,
संभाजी फुफाटे, यशवंत गोफने,बाबुराव साबळे आणि किशोर मुनेमाणिक यांची
नियुक्ती करण्यात आली.तालुका व शहर कार्यकारणीतही विविध पदाधिकार्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. जालना तालुकाप्रमुखपदी आकाश निकाळजे व हरिभाऊ
कांबळे, तर जालना शहरप्रमुखपदी भोलाभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाली आहे.
घनसावंगी तालुकाप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर व विष्णु शिंदे, परतूर
तालुकाप्रमुखपदी दिलीप पाटेकर व गोरख खरात, मंठा तालुकाप्रमुखपदी बाबुराव
साबळे, अंबड तालुकाप्रमुखपदी विलासराव खरात व भाऊसाहेब पाचगे, बदनापूर
तालुकाप्रमुखपदी बाबासाहेब बोबडे व नाना राजगिरे, भोकरदन तालुकाप्रमुखपदी
संदीप काकडे व संजय घोरपडे, तसेच जाफराबाद तालुकाप्रमुखपदी विजय मोरे
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुत्तäयांमुळे जालना जिल्ह्यात शिवसेना दलित आघाडीची संघटनात्मक
ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात तळागाळातील नागरिकांच्या
प्रश्नांसाठी पदाधिकारी सक्रियपणे काम करतील, असा विश्वास शिवसेना दलित
आघाडी जिल्हाप्रमुख अँड. भास्करराव मगरे यांनी व्यक्त केला.
००००००००
फोटो ओळी
– शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्करराव मगरे यांच्या
अध्यक्षतेखाली शिवसेना दलित आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करुन
नियुक्त्या करण्यात आल्या.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















