अक्कलकोट – शिवसेना उ.बा.ठा.गटाचे गटनेते, आमदार अजय चौधरी यांनी आज येथील आराध्य दैवत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे कुटुंबा समवेत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार अजय चौधरी व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. दर्शनानंतर मनोगत व्यक्त करताना आमदार अजय चौधरी म्हणाले की अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जीवन धन्य झाले. येथील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने भाविकांसाठी केलेले व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट आहे. चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानचा कायापालट झाला असून स्वच्छता, भोजन, निवास व दर्शनाची उत्तम व्यवस्था आहे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती लाभो असे मनोगत व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशपाक भाई बळोरगी, नगरसेवक मुस्ताफा बळोरगी,
प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.