सोलापूर : विजापूर रोड सैफुल येथील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे कार्यरत जागृती महिला विचार मंचच्यावतीने श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना, सुजनशीलतेला आणि सुप्त कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आकर्षक मेहंदी रांगोळीच्या कलाकृती साकारल्या.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका कु. ए. बी. नरके आणि ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर या पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ह्युमॅलिटी अँड सायन्स विभागाच्या प्राध्यापिका सौ. एस. एन. गवंडी यांनी काम पाहिले.
मेहंदी स्पर्धेतील विजेते :
प्रथम पारितोषक : तृप्ती कांबळे,
तृतीय पारितोषक : कौसर जहा शेख
तृतीय पारितोषक : अरब कशाफ महमद
रांगोळी स्पर्धेतील विजेते :
प्रथम पारितोषक : अखिला वन्नम,
तृतीय पारितोषक : प्रीती जाधव व ऐश्वर्या तुप्पाद
तृतीय पारितोषक : दिव्या तांबे व प्रणाली गाडे आणि अनुष्का कोकरे व अक्षरा गरदास
रील किंवा व्हिडिओ निर्मिती विजेते :
प्रथम पारितोषक : तृप्ती भालेकर,
तृतीय पारितोषक : साक्षी उप्पीन
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जागृती महिला विचार मंच च्या मुख्य समन्वय सौ सरिता मिठा आणि सज्योता मरेड्डी व विभागवार समन्वयक सुजाता डोके, करिष्मा शेख, प्रज्ञा कुंभार, ऐश्वर्या सोलंकर, जयश्री सचदेव, अश्विनी आहेरवाडी, व स्वाती गाली त्यांचे सहकारी लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी उप्पीन व श्रुती नडगेरी यांनी तर आभार प्रदर्शन सो सरिता मिठ्ठा यांनी मानले.
सर्व विभाग प्रमुख शैक्षणिक समन्वयक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे सचिव श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले आणि उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.




















