सोलापूर : सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने यंदाचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, महानगरपालिकेच्या मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलुगू माध्यमातील ११ उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाज कल्याण केंद्र पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे,अशी माहिती संस्थेचे चेअरमन नागेश गोसावी यांनी दिली.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक १ सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत विविध माध्यमांतील कार्यरत शिक्षकांमधून उपक्रमशील काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव मागविण्यात आले नव्हते. शिक्षकांच्या प्रत्यक्ष शैक्षणिक व उपक्रमशील कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे.पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे आहे.
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये अप्पासाहेब चंद्रकांत ककमारे (मनपा मराठी मुलांची शाळा, कॅम्प), रियाज बिलाल नदाफ (मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्र. ४), हनुमंत कुंडलिक लंगोटे (मनपा मराठी मुलींची शाळा, कॅम्प), दुर्गादेवी गणेश जंजिराल (मनपा मराठी मुलींची शाळा क्र. १०), शिरीन सलामतुल्ला शेख (मनपा मराठी मुलांची हेडक्वार्टर शाळा), विठ्ठल सत्यप्पा वाघमोडे (मनपा मुले कन्नड ३), कल्पना व्यंकटेश कुरापाटी (मनपा मुला-मुलींची तेलुगू शाळा क्र. १), तहसीन सोहेल शेख (मनपा मुलांची उर्दू चिरागली शाळा), शबाना परवीन सोहेल जमादार (मनपा मुलांची उर्दू केंद्रशाळा क्र. ५), महेबूबबी मुश्ताक अहमद शेख (मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३) आणि इम्रान हुसेन मोहम्मद इसाक सौराज (मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ८) यांचा समावेश आहे.
या बैठकीस व्हाईस चेअरमन जहारा नगदेकर यांच्यासह संचालक गंगाधर कांबळे, स्वाती शिंदे, कृष्ण परमेश्वर सुतार, इम्रान जमादार, अफरोज बागवान, मुद्देसर पाशा पिरजादे, शाहीन शेख, केशव गलगली, भास्कर मदनाल तसेच तज्ज्ञ संचालिका स्नेहा पुजारी उपस्थित होत्या.
—–
Post Views: 12