सोलापूर – कॉलेजचे एक वर्ष वाया गेल्याच्या रागात एका 19 वर्षीय विवाहीत तरुणीने फरशी पुसण्याचे फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना न्यू बुधवार पेठ परिसरातील विश्वदीप चौकाजवळ आज रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली .
समृद्धी देवराज गायकवाड (वय 19 वर्ष, रा रा. विश्वदीप चौक सोलापूर) असे फिनाइल पिलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. आज रविवारी दुपारच्या सुमारास घरात असताना तिने हा प्रकार केला. याचा त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात पती देवराज यांनी दुपारी दीड वाजता दाखल केले.
कुत्रा आडवा आल्याने दुचाकीवरील तरुण जखमी )
अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून अजित अंकुश पाटील (वय 28 रा.मंद्रूप ता.दक्षिण सोलापूर) हा तरुण जखमी झाला. तो आज रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकोले मंद्रूप ते सोलापूर येथे दुचाकी वाहनावरून जात होता. डोणगाव रोड येथील नागोबा मंदिराजवळ अचानक कुत्रा आडवा आल्याने हा अपघात घडला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलगरवस्ती पोलिसात याची नोंद झाली आहे.
झोक्यावरून पडल्याने मुलगी जखमी )
एमआयडीसी परिसरातील अविनाश नगर येथे झोक्यावरून खाली पडल्याने आद्या लक्ष्मीकांत हिप्परगी (वय ७ वर्षे) ही मुलगी जखमी झाली. आज रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ती राहत्या घरात झोका खेळत होती .त्यावेळी अचानक झोक्यावरून पडल्याने तिच्या डोकीस जखम झाली. तिला उपचारासाठी जयश्री (आई) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिसात याची नोंद झाली आहे.