Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरातील उपनगरांवर पुन्हा विस्थापनाची टांगती तलवार

तरुण भारतbyतरुण भारत
September 8, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सुमारे ११३ वर्षांपासून रखडलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळत असताना या मार्गाचा फटका पंढरपूर शहरालगतच्या लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी परिसरातील नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या भागातील सुमारे १६ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या परिसरात घरे बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान अनेक वर्षाच्या या भागातील वास्तव्यानंतर एकदमच हे संकट आल्याने या परिस्थितीत आता आम्ही जायचे कुठे ? असा उद्विग्न सवाल या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. या मार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील भूसंपादनाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता उर्वरित २० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी परिसरातील जमीन संपादनासाठी संबंधित अधिकारी नुकतेच या भागात दाखल झाले होते.
———————
चौकट : ( चार दशकांपूर्वी घेतल्या जमिनी, आता विस्थापनाची भीती )
लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी हा परिसर गेल्या काही दशकांत पंढरपूर शहराचा विस्तार झाल्यामुळे उपनगर म्हणून विकसित झाला आहे. अनेक नागरिकांनी ३० ते ४० वर्षांपूर्वी या भागात जमिनी घेतल्या. त्यानंतर बंगले, घरे उभारून कुटुंबासह ते येथे वास्तव्यास आहेत. अनेकांचे या परिसरात व्यवसाय, उपजीविका आणि सामाजिक जीवनही रुजले आहे.
———————
चौकट : ( कॉरिडॉर नंतर रेल्वे मार्गाचे संकट )
एकीकडे पंढरपूर शहरातील मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरमुळे शेकडो नागरिक बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉरिडॉरला बाधित नागरिकांकडून विरोध सुरू असतानाच आता शहरा लगतच्या उपनगरातील नागरिकांवर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनामुळे विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
———-
चौकट : ( ऐवढ्या वर्षाच्या वास्तव्यानंतर आता जायचं कुठे?’)
रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘आम्ही गेल्या ४०-४५ वर्षांपासून या भागात राहत आहोत. घरं बांधली, संसार उभा केला. आता ही जमीन रेल्वेमार्गासाठी गेली तर आम्ही जायचं कुठे?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
———-
चौकट : ( पालकमंत्री, खासदार, आमदारांची भेट घेणार )
या प्रश्नावर परिसरातील नागरिक आता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांच्याकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे मार्गाचा विकास रखडू नये, मात्र त्यासाठी वर्षानुवर्षे या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होऊ नये, यासाठी रेल्वे मार्गात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी देखील केली जाणार असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.
——————
चौकट  : ( विकासाला विरोध नाही; मात्र घरांवर बुलडोझर नको )
पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग हा पंढरपूरच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाला विरोध करण्यापेक्षा विद्यमान वस्ती, घरे आणि नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने मार्ग आखावा, अशी भूमिका या परिसरातील  नागरिकांमधून मांडली जात आहे.
Post Views: 9
Previous Post

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत SVSच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; पारितोषिकावर उमटविला ठसा

Next Post

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड हिचे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड हिचे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत यश

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड हिचे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत यश

ताज्या बातम्या

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026
‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

September 8, 2026

वारंवारच्या ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ संदेशांमुळे मंगळवेढ्यात नागरिक त्रस्त

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1179020

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!