टेंभुर्णी : बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती येथे आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत एस.व्ही.एस कॉलेज ऑफ फार्मास्युटिक एज्युकेशन अँड रिसर्च, टेंभुर्णीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण विषयांवरील पोस्टर्स प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत SVS महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधनाभिमुख उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
Post Views: 6