अक्कलकोट – कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहा गायकवाड हिने दयानंद कॉमर्स कॉलेज सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
दयानंद कॉमर्स कॉलेज यांच्या वतीने जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील 57 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील कुमारी स्नेहा गायकवाड बीएससी भाग 1 मुस्कान शेख व सपना चेंडके बीए भाग 1 यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, पैकी स्नेहा गायकवाड, राहणार कोन्हाळी या विद्यार्थिनींनी स्पर्धेमध्ये नैपुण्य दाखवून क्रमांक पटकावला तिला इंग्रजी विभाग प्रमुख प्रा राजशेखर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजक प्राचार्य डॉ शिवाजीराव शिंदे यांनी तिच्या वाक् चातुर्य विषयी विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी ताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, समन्वयक पूनम कोकळगी, रुपाली शहा, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले.
चौकटीतील मजकूर
कु स्नेहा गायकवाड हिचे यश कौतुकास्पद
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासोबतच
सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे ही महाविद्यालयीन व्यवस्थापनाची जबाबदारी असते या भूमिकेतूनच इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील स्नेहा गायकवाड हिने संपादन केलेले यश कौतुकास्पद आहे असे मत शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.





















