बार्शी – येथील मायबोली सांस्कृतिक मंडळाच्यावतीने नुकतेच येथे हास्यरंग या तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकेकाळी हास्यजत्रा गाजवणारे प्रसिद्ध हास्य कलाकार विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, गौरव मोरे आणि मयुरी रानडे यांनी एकूण चार स्किट सादर केले. अपरात्री घरी आलेला दारुडा नवरा व त्याची चिडलेली पत्नी यांचे प्रहसन, आडनाव बदलण्यासाठी गॅझेट ऑफिसमध्ये आलेला एक तरुण व तेथील महिला अधिकाऱ्याचा संवाद, मंगल कार्यालय चालक व ग्राहक यांची शाब्दिक चकमक आणि अविवाहित ड्रायव्हर व लग्न ठरवण्यासाठी निघालेली प्रवासी तरुणी यांचे संभाषण असे प्रसंग निवडून सर्वच कलाकारांनी त्यातील नाट्य विलक्षण विनोदी आणि परिणामकारक पद्धतीने रंगवले.
चारी स्किटना मायबोलीच्या श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मायबोलीचे संस्थापक, अध्यक्ष विजयकुमार माढेकर आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांसमोर दीपप्रज्वलन करुन झाली. प्रास्ताविक मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत मोहिरे यांनी करुन दिला. पाहुण्यांचा सत्कार शुक्लाभाभी माढेकर,जवाहर माढेकर, प्रमोदिनी कोठारी, शिल्पा माढेकर,पल्लवी माढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आभार राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली मोहिरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पंढरपूर बँकेचे अधिकारी अमित उत्पात, अरुण शहा, व्यंकटेश कुलकर्णी आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पाटील, जितेंद्र माढेकर, निलेश माढेकर, राजेश खाडे, डॉ.योगेश कुलकर्णी, डॉ.तेजस लाड, सुमन चंद्रशेखर, शारदा पानगावकर यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 6