या प्रसंगी प्रथम महाळुंग – श्रीपूर चे माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव , आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले , सामाजीक कार्यकर्ते अल्लाबक्ष शेख, उद्योजक महावीर शहा, आप्पासाहेब नाईकनवरे , रोहीत काळे , मंडळाचे अध्यक्ष शेखर जाधव , यांचे हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला . यानंतर शेखर जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या वतीने गेल्या ६ वर्षा पासून आम्ही जयंती साजरी करीत असल्याचे सांगून इंग्रजांविरुद्धच्या स्वांतंत्र्य लढ्यात राजे उमाजी नाईक यांनी शसस्त्र क्रांतीचे पहिले बंड प्रकारून १४ वर्षे इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या विरोधात लढा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले म्हणून त्यांची शसस्त्र आद्य क्रांतीवीर म्हणून इतिहासात नोंद झाली असल्याचे सांगीतले . या प्रसंगी संजय वाघचौरे, बबलू यादव, गुलशन मंडले, राजू गुजले , सुनिल भोसले , शहाजी माने, राजू लोखंडे , सुनिल जाधव उपस्थित होते .






















