सोलापूर – ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, गोभणी,. मेहकर जि. बुलढाणा द्वारा विविध साहित्यकृतींना देण्यात येणारे ‘राज्यस्तरीय ग्रामनाथ साहित्य पुरस्कार – २०२६’ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार व लेखक श्री भगवान राईतकर यांनी नुकतेच जाहीर केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे डॉ. शिवाजी शिंदे लिखित ‘निवडक स्त्री आत्मकथने : सामाजिक सत्व आणि स्वत्व शोध ‘ या ग्रंथास “समीक्षा विभाग” अंतर्गत’ग्रामनाथ साहित्य पुरस्कार-2026 जाहीर झाला आहे. या ग्रंथास मिळालेला हा 8 वा पुरस्कार मिळाला आहे.
रविवार दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी १० वाजता, जिजाऊ नगर, शासकीय वस्तीगृहामागे, डीपी रोड जिजाऊ नगर, मेहकर जि. बुलढाणा येथे आयोजित पाचव्या ‘साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनामध्ये पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान राईतकर यांनी कळवले आहे.
डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ निवडक स्त्री आत्मकथने : सामाजिक सत्व आणि स्वत्व शोध’ या ग्रंथास यापूर्वी विविध साहित्यिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ‘छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार’, ऍग्रोवन परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण च्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनात देण्यात आलेला ‘उत्कृष्ट संशोधन ग्रंथ पुरस्कार’, स्व. सूर्यकांतादेवी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती चा ‘स्व.सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे राज्यस्तरीय मराठी वाड़्मय पुरस्कार’, डॉ. भा. ल. भोळे विचारमंच, नागपूर यांचा ‘संदर्भ ग्रंथ पुरस्कार’, काव्यप्रेमी शिक्षक मंच, महाराष्ट्र यांचा ” मातोश्री कै. शालिनी चिंचवडकर स्मृती संशोधन पुरस्कार’, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा दामाजीनगर यांचा ‘ पद्मिनी कृष्णा यादव पुरस्कार’, तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचा ” तितिक्षा इंटरनॅशनल ग्रंथ पुरस्कार (सर्वोत्कृष्ट समीक्षा ग्रंथ) ‘ इत्यादी पुरस्काराचा समावेश आहे.
डॉ. शिंदे यांच्या ‘ निवडक स्त्री आत्मकथने : सामाजिक सत्व आणि स्वत्व शोध’ या ग्रंथास मेहकर जि. बुलढाणा येथील ‘ग्रामनाथ साहित्य पुरस्कार – 2025’ मिळाल्याबद्दल त्यांचे साहित्य, शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात अभिनंदन होत आहे.
Post Views: 17