सोलापूर : युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात व विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे, सुमधुर गीते, काव्यवाचन, पहेलियां (कोडी), चुटकुले, नाटक आणि मनमोहक नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पालक-शिक्षक संघाच्या सदस्या गोसिया समीर पटेल उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा बाजपाई यांनी भूषवले.तसेच शाळेच्या समन्वयिका मानसी झळकिकर व पर्यवेक्षिका गौरा उडचण यांची उपस्थिती होती.
गोसिया पटेल म्हणाल्या, हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून संशोधन आणि समृद्ध भारतीय संस्कृतीची परंपरा जपणारी भाषा आहे. अध्यक्षीय भाषणात पूजा बाजपाई यांनी भाषेचे महत्त्व स्पष्ट करत, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात विविध भाषांचा आदर करावा आणि वाचन संस्कृती जोपासावी, असा मोलाचा सल्ला दिला.
हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर शिवदारे , शैक्षणिक सल्लागार अंजली तिवारी , सदस्य डॉ. शुभदा उपासे आणि मुख्याध्यापिका पूजा बाजपाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी हुजेफा शेख व अफिया मुल्ला यांनी केले, तर जानवी कस्तुरकर हिने उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 26