सोलापूर : श्री गणेशोत्सवानिमित्त सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशमूर्तीची विधिवत व भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. ‘**गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शैक्षणिक संकुल परिसर दुमदुमून गेला.
सो. स. क्षत्रिय समाज (विठ्ठल मंदिर) ट्रस्ट, सोलापूर संचालित सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा बाबुरावसा भुमकर व केशरताई राजुसा भुमकर यांच्या हस्ते गणेशमूर्तीची विधिवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार व आरती करून स्थापना करण्यात आली.या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष संजीवसा महादेवसा बिद्री संस्थेचे पदाधिकारी,शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशस्थापनेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. गणरायाच्या दर्शनासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरण, फुलांची आकर्षक सजावट आणि जयघोषामुळे संकुल परिसरात उत्सवाचे चैतन्य निर्माण झाले होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत अशी माहिती सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
Post Views: 27