Sunday, November 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा – युवराज पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
September 16, 2026
in west maharashtra
0
मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा – युवराज पाटील
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सांगोला – बौद्धिक विकासाबरोबरच संस्कार आणि नैतिकतेची जपणूक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, हेच गुरुवर्य बापूसाहेबांच्या शिक्षणप्रसाराचे मुख्य ध्येय होते.मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा असून आजच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी केले. सांगोला विद्यामंदिरच्या प्रांगणात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी ४५ वा स्मृतीसमारोह त्यानिमित्त घेतलेले विविध कार्यक्रम व सांगता समारंभ याची माहिती देत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही नामांकित शिक्षण संस्था आता अमृत महोत्सवी वर्षाच्या विशेष पर्वात आहे त्यामुळे  वैविध्यपूर्ण आणि समाजोपयोगी कार्यक्रमातून अमृत महोत्सवी वर्ष  समृद्धपणे साजरे करणार आहोत असे सांगत कार्यक्रमाचा हेतू सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले
    यानंतर पुढे बोलताना प्रमुख पाहुणे युवराज पाटील यांनी बापूसाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा अतिशय प्रभावी शब्दांत वेध घेतला. गुरुवर्य बापूसाहेबांनी संस्कारांतून केलेली नैतिकतेची जपणूक, बौद्धिक विकासासोबतच मूल्यांची घातलेली सांगड, राष्ट्रध्वजाला सलामी देताना डबडबलेले त्यांचे डोळे आणि साने गुरुजींच्या सान्निध्यातून घेतलेली मूल्यांची शिकवण यांसारख्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. अभय बंग आणि अंतराळवीर कल्पना चावला यांसारख्या उत्तुंग कार्य करणाऱ्या महापुरुषांची व ध्येयवेड्या व्यक्तींची प्रेरणादायी उदाहरणे देत, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्टाचे सातत्य, संकटांना पायाखाली घेण्याची वृत्ती आणि अपयश पचवण्याचे सामर्थ्य विकसित करण्याचे आवाहन केले. ‘सर्वसामान्यांच्या पोरांना गमवायला शून्य, तर कमवायला अख्खं जग आहे; त्यामुळे मन, मेंदू आणि मनगट ताब्यात ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास कर्तृत्व सिद्ध व्हायला वेळ लागत नाही’, असा धारदार कानमंत्र  दिला.
 जगन्नाथ साठे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा.धनाजी चव्हाण यांनी ‘कै. बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.त्यानुसार कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भागवत भाटेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी यांना पत्नी पोळ मॅडम यांचेसमवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ‘सांगोल्याचे बापूजी’ चरित्र ग्रंथ व रोख रुपये  देऊन प्रदान करण्यात आला. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना भागवत भाटेकर म्हणाले हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, माझ्या शिक्षक म्हणून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाची मनःपूर्वक दखल आहे. विशेष म्हणजे मी या शाळेचा विद्यार्थी आहे त्यामुळे हा सन्मान माझ्या कार्याला नवी ऊर्जा आणि अधिक जबाबदारीची जाणीव देणारा आहे.
यानंतर संस्थांतर्गत गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला विद्यामंदिर प्रशाला मंगेश बबनराव म्हमाणे,सिताराम मारुती राऊत, ज्युनिअर कॉलेज प्रा.डी.के.पाटील, कोळा विद्यामंदिरचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा काकासाहेब तुकाराम पांढरे,नाझरा विद्यामंदिर प्रशाला ज्युनियर कॉलेज नाझरा रावसाहेब गोरख बंडगर, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय अविनाश विठ्ठल दिघे, इंग्लिश मेडियम स्कूलचे संगमेश्वर वैजीनाथ घोंगडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच सांगोला विद्यामंदिरचे चांगदेव दिलीप कुंभार यांना गुणवंत लिपिक व मोहसीन शब्बीर मुजावर यांना गुणवंत सेवक पुरस्काराने सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप,शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,प्रसाद झपके, संस्था सदस्य राजश्री झपके,अंजली झपके,झपके कुटुंबीय सांगोल्यातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार,  विद्यामंदिर परिवारातील सर्व आजी-माजी प्रशासकीय अधिकारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले, तर आभार प्राचार्य चारूदत्त जगताप यांनी मानले.
 *चौकट* – *भावपूर्ण समाधी दर्शन व प्रार्थनामय आदरांजली*
 सकाळी ७ वाजता  गुरुवर्य बापूसाहेबांच्या समाधीस्थळी अत्यंत पवित्र व भावपूर्ण वातावरणात समाधी दर्शन आणि प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या शांततेत सुमधुर प्रार्थनेतून आणि सर्वधर्मीय विचारांतून सर्वधर्मसमभावाचा उदात्त संदेश देण्यात आला. यावेळी निनादलेली ‘रामधून’, गीताईचे श्लोक आणि ‘अहिंसा, सत्य, अस्तेय’ या शाश्वत जीवनमूल्यांची आठवण करून देणाऱ्या भक्तीमय उपासनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
समाधी दर्शनानंतर सकाळी ८ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे संस्था सदस्य व बापूसाहेबांच्या कन्या मंगलप्रभा कोरी व सांगोला विद्यामंदिरच्या १९६८ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवर्यांच्या तैलचित्रास कृतज्ञतापूर्वक पुष्पहार समर्पित करण्यात आला यावेळी मानवतेचा व विश्वबंधुत्वाचा सर्वोच्च संदेश देणाऱ्या प्रार्थनेचा जागर करण्यात आला.  अंतिमतः परम सत्याची प्रचिती करून देणाऱ्या ‘ओम् तत् सत्’ या सामुदायिक प्रार्थनेने या मंगलमय सत्राची सांगता झाली.
Post Views: 79
Previous Post

नेताजी प्रशालेत हिंदी दिवस उत्साहात

Next Post

अनिल काळे यांना ओन्ली समाजसेवा संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अनिल काळे यांना ओन्ली समाजसेवा संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

अनिल काळे यांना ओन्ली समाजसेवा संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ५३ लाख

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

October 31, 2026

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता

October 31, 2026
रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

October 31, 2026

ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन मंजूर

October 31, 2026
तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

October 31, 2026
यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

October 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1448981

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!