पिलीव – महाराष्ट्रात यंदा दरवर्षी पेक्षा कमालीचा पाऊस कमी झाला आहे.यामुळे यंदा कॅनालवरील क्षेत्राचा अपवाद वगळता इतर ठिकाणी ऊस नाहीच. यामुळेच यंदा दरवर्षी पेक्षा ऊसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. तसेच पाऊस नसल्यामुळे ऊसाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही उत्पादनात मोठी घट होणार हे अगदी स्पष्ट दिसत आहे. माळशिरस तालुक्यात कॅनाल खालील भागातच ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. याच ऊसावर माळशिरस तालुक्यातील तसेच शेजारच्या पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदाराचे विशेष लक्ष असुन चांगल्या दराची चढा ओढ करीत ऊसाची पळवापळवी होणार हे निश्चित आहे. सध्या पावसाळा संपत आला तरीही अद्यापपर्यंत पाऊसच नाही .यामुळे ऊसाचा चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. जर पाऊसच झाला नाही तर शासन चारा छावण्या सुरु करेल याठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऊसाची गरज भासणार आहे. बाजारात यंदा साखरेचा दर चांगला आहे यामुळेच शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा अशी अपेक्षा आहे. साखरेचा दर व इतर उपपदार्थ यांच्या वाढलेल्या किमतीचा विचार करता तसेच मशागत, खतांच्या व औषधांच्या वाढलेल्या किमतीचा विचार करता ऊसाला पहीला हप्ता 4000 रुपये मिळावा अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.माळशिरस तालुक्यात सहकार महर्षी अकलूज, शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी, सासवड माळीनगर व पांडुरंग साखर कारखाना श्रीपुर असे पाच साखर कारखाने आहेत. पण या कारखान्यावर दराबाबत शेतकऱ्यांचा किती विश्वास आहे हे सांगणे कठीण आहे. शासन यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरु करणार आहे.यामुळेच साखर कारखानदार सध्या ऊसासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही चांगला दर देऊ ऊस आम्हालाच द्या अशी अक्षरश विनवणी करु लागले आहेत. पण शेतकरी म्हणतात चांगला म्हणजे नक्की किती यामुळे कारखानदाराची सध्या तरी मोठी गोची झाली आहे. माळशिरस तालुक्यातील ऊसावर सध्या पुणे जिल्ह्य़ातील बारामती येथील माळेगाव, भवानीनगर , सोमेश्वर, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शरयु, स्वराज,साखरवाडी, श्रीराम, तसेच जरंडेश्वर या साखर कारखान्याची तसेच सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखाना, कवठेमहांकाळ येथील साखर कारखाना यासह इतर कारखाने माळशिरस तालुक्यातील ऊस नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत .तर सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी, भाळवणी येथील चंद्रभागा हे साखर कारखाने माळशिरस तालुक्यातील ऊसाची पळवापळवी करु शकतात. यंदा सोलापूर जिल्ह्यासह सातारा, पुणे जिल्ह्य़ात ऊस तोडणारया अनेक टोळ्या कारखाने सुरु होण्यापूर्वीच आल्या आहेत. सातारा ,पुणे व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारापेक्षा चांगला दर देतात यामुळेच त्या दोन्ही जिल्ह्यातील कारखान्यांना माळशिरस तालुक्यातील ऊस मोठया प्रमाणावर गाळपास जातो य त्यामुळे यंदा सुद्धा माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा बाहेरच्या जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस देणयाकडे मोठा कल दिसुन येत आहे.सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असले तरी सर्वात कमी ऊस दर याच जिल्ह्यातील साखर कारखानदाराकडुन दिला जातो हे शेतकऱ्यांना आता चांगलेच समजले आहे यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना यंदाच्या दुष्काळाच्या सावटाखाली होणाऱ्या गाळप हंगामात ऊस मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. चौकट _ बारामती येथील माळेगाव साखर कारखान्याने उपमुख्यमंञी सुनेञाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3500 रुपये दर जाहीर केला आहे .पण शेतकऱ्यांना पहीला हप्ता 4000 रुपये अपेक्षित आहे. चौकट _ माळशिरस तालुक्यातील कोणताही कारखाना ऊसाला चांगला दर देत नाही .तसेच ऊस बिलेही वेळेवर देत नाही यामुळेच आम्ही पुणे किंवा सातारा जिल्ह्यातील जो कारखाना चांगला दर देईल त्या कारखान्यास ऊस देणार. तालुक्यातील कारखानदारांच्या अमीषाला अजिबात बळी पडणार नाही. __ संजय पाटील, ऊस उत्पादक शेतकरी.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















