सोलापूर – श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा श्री आजोबा गणपतीची पूजा कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष तथा आमदार विजय देशमुख यांनी विजयानंद काशप्पनवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी बिपीन धूम्मा, गुरुनाथ निंबाळे, सोमनाथ मेंडके, श्रीशैल गदगे, विशाल फुलारी, प्रफुल्ल झाडबुके, जगदीश किणीकर, अंबालाल भिमनपल्ली, किरण अक्कलकोटे, अमित काबणे, सुरेश हचडे आदी उपस्थित होते.




















