मोडनिंब – पावसाअभावी शेतकरी, पशुपालक तसेच व्यापारी वर्गावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यंदा मुबलक पाऊस पडून परिसरातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, यासाठी मोडनिंब(ता. माढा) येथील शिवशंभो गणेश तरुण मंडळाच्या (गोलावरचा राजा) वतीने गुरुवारी (दि. १७) ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान, हनुमान मंदिर व महालिंगेश्वर मंदिर येथे पावसासाठी साकडे घालण्यात आले.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्नान करून पाणी अर्पण करून वरुणराजाला मुबलक पावसासाठी प्रार्थना केली. यंदा चांगला पाऊस पडून शेतकरी, पशुपालक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.यावेळी अध्यक्ष मुन्ना जाधव, उपाध्यक्ष महेश लादे, सचिव रोहन ढोबळे, तसेच मार्गदर्शक संपत महामुनी, अजय शिंदे, संतोष लादे, अनुप जाधव, प्रवीण लादे, सागर कुटे, सुधीर लादे, सुमित जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















