धाराशिव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त धाराशिव येथील काँग्रेस भवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरोधात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी मुक्तिसंग्रामातील वीरांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
याप्रसंगी स्वातंत्र्य, लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रनिष्ठा जपण्याचा संकल्प करण्यात आला. देशाच्या एकात्मतेसह सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि राष्ट्रहितासाठी सदैव कार्यरत राहण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर,राजेंद्र शेरखाने,प्रशांत पाटील, धनंजय राऊत, विनोद वीर,शिवाजीराव गायकवाड, तनुजा हुड्डे, गोरोबा झेंडे,पोपट शिंदे,हरिदास शिंदे, विलास शाळू, शिवानंद तोडकर,ज्योतीराम निमसे, अशोक पेठे,प्रभाकर लोंढे,संजय गजधने, अशोक बनसोडे,सोपान वरवडे, करण कांबळे, बसवराज पाटील, अनिल चांदणे, इमाम शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.





















