अक्कलकोट – येथील कुंभार गल्लीतील श्री शांत लिंगेश्वर हिरेमठ हे अक्कलकोट करांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. अशा ठिकाणी पुराणाचे आयोजन होणे हे आमचे भाग्य आहे. पुराण कथेतून आपल्याला आपल्या संस्कृतीचे, संस्काराचे दर्शन घडते असे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले.
नुकतेच कुंभार गल्लीतील श्रीशांत लिंगेश्वर हिरेमठ येथे पुराण समाप्ती सोहळा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. यावेळी प्रथमेश इंगळे यांनी शांत गुरु लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे
कृपावस्त्र, प्रसाद देवून व हार घालून यथोचित सत्कार केला. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना प्रथमेश इंगळे म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात तरुणांनी अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. शांत गुरु लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहोत. सर्व भक्तांचे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो असेही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मल्लिकार्जुन मंदिर समितीचे अध्यक्ष
शिवकुमार स्वामी, महेश हिंडोळे, वीरपाक्ष कुंभार, गंगाधर कुंभार, धोंडप्पा कुंभार, शरणू कुंभार यांच्यासह महिला, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – पुराण समाप्ती नंतर शांत गुरु लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे, महेश हिंडोळे व अन्य दिसत आहेत.
Post Views: 14