पिलीव – दरवर्षी प्रमाणे ज्येष्ठा गौरी माहेर वाशिनी गौराई तथा श्री महालक्ष्मीच्या आगमना प्रित्यर्थ रविवार दिना17 सप्टेंबर पासून गौराई तथा श्री महालक्ष्मीचे आगमन झाल्यानंतर पिलीव परीसरातील महिलांमध्ये सजावट करण्याची लगबग सुरू होऊन अप्रतिम देखावे सजावट करण्यासाठी जणू अघोषित स्पर्धाच लागलेली दिसत होती. महालक्ष्मी समोरील सजावटीसाठी लागणारे सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ,फळे देखाव्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खेळणी गोळा करण्यासाठी लगबग सुरू होती स्टेशनरीच्या दुकानात ,मेवा मिठाई व हाँटेलमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील देखावे सर्व प्रकारची फळे ,खेळणी चित्रातून मांडले जाणारे काल्पनिक देखावे द्रष्ट लागावे असे तयार करण्यासाठी जणू अघोषित स्पर्धाच लागलेली दिसून येत होती. एकापेक्षा एक सरस असे देखावे सोशल मिडीयावरील स्टेटस व प्रत्यक्षरीत्या पहावयास मिळाले. महिलांनी आपली कला अनुभव व घरातील सुना सासूची नणंदांची ,जावांची व शेजाऱ्या पाजाऱ्या महिलांची मैत्रिणीची मदत घेऊन अप्रतिम उत्कृष्ट मनमोहक असे सजावटीतून समाज प्रबोधन परदेखावे सादर केल्याचे पहावयास मिळाले. पिलीव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ अनिता अविनाश जेऊरकर , सौ वर्षा कोळी,सौ विजयालक्ष्मी गोरे, अशा एकाहून एक कितीतरी देखावे महिलांनी आपली कल्पना व कला कौशल्य पणाला लावून अप्रतिम असे मनमोहक सजावट केल्याचे आले.
तीन दिवसाचे कार्यक्रम यामध्ये पहिल्या दिवशी आवाहन भाजी भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य व तिसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम होऊन गौराई तथा श्री महालक्ष्मीस भावपूर्ण वातावरणात निरोप देऊन विसर्जन करण्यात येते .पिलीव परीसरातील पिलीव, कुसमोड, झिंजेवस्ती भागातील महीलांनी गौराई पुढे नेत्रदीपक असे डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे तयार केले होते. फोटो _स्वाती सतीश गोंजारी
Post Views: 12