कारखान्याच्या सात गटांमधून प्रत्येक हंगामासाठी आडसाली, सुरू, पूर्वहंगामी ऊसास
प्रत्येक गटामध्ये एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यांची नावे खालिल प्रमाणे आहेत
१) नागन्नाथ पंढरीनाथ पवार मु.पो. उंबरगांव. २ ) राजनाबाई शिवाजी कांबळे
मु.पो. खर्डी
३ ) शिवाजी श्रीमंत रोंगे
मु.पो. खर्डी
४ ) माधव तानाजी जाधव
मु.पो. रोपळे
(गट देगांग )
५ ) श्रीकांत हरिदास घाडगे
मु.पो. अजनसोंड
(देगांव गट ) ,६ )सरोजनी जयसिंग भुसनर
मु.पो. शिरढोण
(देगांव गट )
७ ) उत्तम शंकर घाडगे
मु.पो. अजनसोंड
(देगांव गट )
९ ) लिंगेश्वर भारत पिसे
मु.पो. सरकोली (चळे गट )
९) कृष्णा तुळशीराम नागणे
मु.पो. कोंढारकी (चळे गट )
१० ) संजय जालिंदर देठे
मु.पो. धोंडेवाडी (भाळवणी गट )
११ ) दिपक भानुदास यलमर
मु.पो. सुपली (भाळवणी गट ) ,१२ ) सुवर्णा पोपट तळेकर
मु.पो. भोसे (भोसे गट )
१३ ) नानासो किसन नाईकनवरे
पट. कुरोली (भोसे गट )
१४ ) मुरलीधऱ दामु बंडगर
करोळे (करकंब गट )
१५ ) राजेंद्र सुखदेव शिंदे
मु.पो. कान्हापुरी (करकंब गट )
१६ ) तानाजी शंकर मुळे
उंबरे पा. (करकंब गट )
१७ ) जयसिंह भाऊसाहेब पाटील
मु.पो. बोरगांव ( माळशिरस )
यावेळी कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांनी ही स्पर्धा गेली आठ वर्षांपासून मा. आ. कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या संकल्पनेतून व कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
स्पर्धेची सुरुवात लागण हंगाम सुरू झाल्यानंतर होते. जे शेतकरी आडसाली, पूर्व हंगाम, सुरू व खोडवा या हंगामामध्ये ऊसाची लागण/खोडवा करतात, ते या स्पर्धेसाठी पात्र असतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा शेतकरी कारखान्याचा सभासद असणे आवश्यक आहे.
कारखान्याने ठरवून दिलेल्या को- ८६०३२ , कोसी- ६७१, व्हीएसआय- ०८००५, सीओ व्हीसआय १८१२१, एम १०००१, पीडीएन १५०१२, व्हीएसआय ४३४ या ऊस जातींचीच ऊस लागण करणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केल्यापासून ऊस तोडणीपर्यंत विविध मुद्यांच्या आधारे १०० गुणांची तपासणी करण्यात येऊन हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
स्पर्धेतील शेतकऱ्यांना मा. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर व शेती अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी ऊस पीक घेत असताना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.




















