सोलापूर : निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमीत सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नवीन हंगामासाठी पांढरा क्रिकेट गणवेशाचा वाटप येथील सोन्या चांदीचे आराध्य ज्वेलर्सचे मालक मल्लिनाथ कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील वर्षाच्या क्रिकेट हंगामामध्ये निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी ने वर्षभरात अनेक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले विशेष म्हणजे अकॅडमी मधील चांगल्या क्रिकेट खेळाडूंचे संख्या लक्षात घेऊन टीमचे दोन ए वो बी असे संघ निवडणे भाग पडते. या दोन्ही टीमने या अकॅडमीस अंतिम सामन्यात पोहोचवले आहे. मास्टर क्रिकेट टूर्नामेंट मध्ये अकॅडमीचे 14 वर्षाखालील व सोळा वर्षाखाली संघाने अंतिम चषक पटकाविला. आपटे ग्रुप टूर्नामेंटमध्ये विजयी व उपविजयी आपटे चषक पटकावला. तसेच अकॅडमीच्या इंटर क्लब स्पर्धेत 14, 16 व 19 च्या वर्षाखालील स्पर्धेत 88 खेळाडूनी भाग घेतल्या होता. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष विकेश गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र गोटे निवड समिती चेअरमन सुनील मालप, पोलीस अधिकारी महिंद्र गायकवाड, अकॅडमीचे संचालक निलेश गायकवाड, विनोद पाटील, प्रा. डॉ. वाल्मीक किर्तीकर, दीपक सुरवसे, अनुजकुमार चौधरी, नितीन टेकाळे आदी उपस्थित होते. अकॅडमीच्या खेळाडूंना मल्लिनाथ कापसे यांनी गणवेश आपल्या वतीने स्पॉन्सर केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले.
——
Post Views: 40