सांगोला – जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सांगोला महाविद्यालय येथे इतिहास विभागाच्या वतीने भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे, विद्यापीठाचे माजी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.विकास कदम, प्रा.डॉ.राजकुमार महिमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याच्या माध्यमातून पर्यटनातून इतिहास व वारशाची ओळख, वारशातून संवर्धनाची जाणीव हा संदेश देण्यात आला. यासाठी प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर, डॉ.महेश घाडगे, प्रा.अमोल ऐवळे तसेच इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.