सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित अंडर-२३ महिला निवड चाचणी कॅम्पसाठी सोलापूरच्या चौघींची निवड झाली. यामध्ये भक्ती पवार, स्नेहा शिंदे, अमृता गव्हाणे आणि आर्या उमाप यांचा समावेश आहे.
मागील आठवड्यात एमसीएतर्फे घेण्यात आलेल्या टी-२० निमंत्रित सामन्यांमध्ये या खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्यांची या कॅम्पसाठी निवड करण्यात आली आहे. ही विशेष निवड चाचणी कॅम्प पुणे येथे एक महिना चालणार आहे.
या खेळाडूंच्या यशाबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन श्रीकांत मोरे, संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते-पाटील, चंद्रकांत रेंबर्सु, स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर आणि मानसी जाधव आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .
——
खेळाडूंची कामगिरी अशी:
निमंत्रित सामन्यांमध्ये सोलापूर संघाकडून खेळताना या मुलींची पाच सामन्यातील कामगिरी : भक्ती पवार (१० बळी), स्नेहा शिंदे ( ८ बळी) अमृता गव्हाणे ( ६ बळी), आर्या उमाप (२११ धावा ).
—-





















