सोलापूर – श्रीकृष्ण कुस्ती केंद्र येथे झालेल्या शालेय जिल्हा कुस्ती स्पर्धेत मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी नाईट कनिष्ठ महाविद्यालयाच्या ५ मल्लानी अजिंक्यपद पटकाविले. या कामगिरीवर त्यांची पुणे विभागासाठी निवड झाली.
सर्व यशस्वी खेळाडूंना उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भरत मेकाले, लक्ष्मण सरवदे, ताजी वस्ताद, प्रा. सचिन गायकवाड आणि मारुती घोडके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, सचिव प्रा. महेश माने, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे, प्रा. संतोष गवळी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुजाता जुगदार, प्राचार्य एम. डी. पाटील, गोकुळ यादव, प्रा. अश्विन नागणे, प्रा. गिरीश लोंढे, प्रा. हरीश गरड आणि प्रा. जगन्नाथ पांढरे आदींनी अभिनंदन करून पुणे विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
——-
शहर स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविलेले मल्ल : पृथ्वीराज सरवदे: फ्री स्टाईल (५७ किलो गट), सुजित काळे: ग्रीको रोमन (खुला गट), पुरुषोत्तम कुलकर्णी: ग्रीको रोमन (५१ किलो गट)शिवराज चौगुले: फ्री स्टाईल (५५ किलो गट), कृष्णा परळकर: फ्री स्टाईल गट.
——-

















