सोलापूर – येथील टू व्हीलर असोसिएशन ऑफ सोलापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली या सभेत सभासदांच्या अडचणीसह परिवहन विभागाकडून होणाऱ्या तांत्रिक बदलाची माहिती देण्यात आली आणि त्याचा आढावा घेण्यात आला.
अध्यक्ष उल्हास कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल निसर्ग सोलापूर येथे संपन्न झालेल्या या टू व्हीलर असोसिएशनच्या बैठकीचे नियोजन अति उत्तमरीत्या करण्यात आले होते यामध्ये सभासदांना येणाऱ्या तांत्रिक सोडविण्यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच परिवहन विभागाकडून वारंवार होणाऱ्या नवीन बदलांचा आढावा देखील यावेळी घेतला गेला या बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष राजू कांबळे खजिनदार सुधीर पिंपरे सचिव योगेश जगदाळे यांच्यासह ही बैठक पार पडली.
या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी आपल्या ला येणाऱ्या महत्त्वाच्या अडचणीवर चर्चा केली आणि त्यावर यशस्वीरित्या तोडगा देखील काढण्यात आला. तसेच आजच्या सभेत नवीन सभासदांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला. सदर बैठकीस संचालक मंडळासह सर्व सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
फोटो ओळी – डावीकडून राजू कांबळे, सुधीर पिंपरे, योगेश जगदाळे अणि अध्यक्ष उल्हास कटकधोंड*
Post Views: 11