Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्ह्यातील अनधिकृत जार प्लांटवर कारवाईचे संकेत !

तरुण भारतbyतरुण भारत
September 29, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत असताना गावोगावी वाढलेल्या जार प्लांटच्या व्यवसायावर आता प्रशासनाची नजर वळली आहे. परवानग्या न घेता अथवा पाण्याची गुणवत्ता तपासणी न करताच सुरू असलेल्या जार प्लांटची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाली आहे. शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्याने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याचा फायदा घेत अनेक गावांमध्ये जार प्लांटची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
( जिल्हा परिषद आणि सी ई ओ कुशल जैन यांचा फोटो लावणे)
मात्र, पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या या प्लांटची परवानगी आणि पाण्याची गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी बोअरवेलचे पाणी योग्य पद्धतीने शुद्धीकरण न करता विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. काही प्लांटमध्ये फिल्टर यंत्रणेऐवजी इतर पद्धतींचा वापर करून पाणी थंड करून विकले जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अशा पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात जार प्लांटची तपासणी नेमकी कोणत्या विभागाने करायची, याबाबत गेल्या काही वर्षांपासून संभ्रमाची स्थिती होती. मात्र, आता या मुद्द्यावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. परवानगीशिवाय सुरू असलेले तसेच पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी न केलेले प्लांट तपासण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काटकर यांना देण्यात आले आहेत.
तपासणीत काय पाहिले जाणार?
तपासणीदरम्यान जार प्लांटकडे आवश्यक परवाने आहेत का, पाण्याचा स्रोत कोणता आहे, पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी केली जाते का, शुद्धीकरणाची प्रक्रिया योग्य आहे का आणि व्यावसायिक वापरासाठी पाणी सुरक्षित आहे का, याची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
चौकट
तर होऊ शकते कारवाई
पाण्याच्या नमुन्यांमध्ये आरोग्यास घातक घटक आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ‘परवाना आणि गुणवत्ता’ ही दोन्ही बंधने आता महत्त्वाची ठरणार आहेत.
कोट
परवानगी आणि गुणवत्तेची तपासणी महत्त्वाची
जार प्लांट सुरू करताना संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाची परवानगी तसेच पाणी व गुणवत्ता विभागाकडून पाण्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य असल्याचा दाखला घेणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 7
Previous Post

वार्षिक बैठकीत परिवहन विभागाकडून वारंवार होणाऱ्या नवीन बदलांचा आढावा घेण्यात आला

Next Post

आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती पूर्ण; वकिलाच्या नोटिसावर सीईओ कुशल जैन यांचे स्पष्टीकरण  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती पूर्ण; वकिलाच्या नोटिसावर सीईओ कुशल जैन यांचे स्पष्टीकरण  

ताज्या बातम्या

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

ऊसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे जप्त

September 29, 2026
सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

September 29, 2026

18 वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या

September 29, 2026
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

September 29, 2026

श्री भ्रमरांबिका नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी शिवानंद बेलाटे

September 29, 2026

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी मनपाचे गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर

September 29, 2026

श्री भगवंत देवस्थानच्यावतीने नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

September 29, 2026

भटके विमुक्त विकास परिषदेमार्फत विशेष शिबिराचे आयोजन

September 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1276909

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!