सांगोला – मेथवडे (ता.सांगोला) येथील सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जीपॅट-२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये बी.फार्मसी अंतिम वर्षाची नेहा बन्टु जाधव व तृतीय वर्षाची सुप्रिया संतोष पवार यांनी विशेष प्रावीण्यासहीत उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, जीपॅट विभागाचे प्रा.एस.एस.काळे यांच्या हस्ते सत्कार करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद व त्यांचे मार्गदर्शन, कॉलेजने आयोजित केलेले मार्गदर्शनपर व्याख्याने, सुसज्य ग्रंथालय, डिजिटल क्लास रूम याची आम्हाला या केंद्रीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मोलाची मदत झाली असे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.
Post Views: 27