टेंभुर्णी – मोडनिंब (ता. माढा) येथे अज्ञात चोरट्याने शिक्षकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी, कोयंडा व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील चांदीचे दागिने, महागडे हातातील घड्याळ आणि तब्बल २ लाख रुपये रोख, असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मोडनिंब येथील शिक्षक अन्वरहुसेन बापूसाहेब मुलाणी (वय ५१) हे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी, कोयंडा व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर रूममधील कपाटातून दोन जोड चांदीचे पैंजण, चांदीची गळ्यातील चैन, चांदीचे कडे, चांदीची अंगठी, टायटन कंपनीचे हातातील घड्याळ तसेच २ लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेबाबत शिक्षक अन्वरहुसेन मुलाणी यांनी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सपोनि रोहित पवार करीत आहेत.
Post Views: 9