सोलापूर : शिस्त पाळत उत्सव साजरा करा, मिरवणुकीत अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते. मिरवणुकीत अफवा पसरू नये, शासनाने दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करावे.त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांकडून सक्त कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आज मंगळवारच्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून दिला.
सर्वच उत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मिरवणुकीमध्ये अफवा अथवा गैरसमज पसरवणाऱ्या कोणत्याही प्रकाराला थारा देऊ नये. उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनासह नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे आयुक्तांनी म्हंटले.
उत्सव मंडळांनी स्वयंसेवकांची व्यवस्था करून त्यांच्यामार्फत गर्दीचे नियोजन करावे. मंडप परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मिरवणुकीच्या वेळी वाहनचालकांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. बैठकीत शांतता समिती सदस्यांनी विविध समस्या व सूचना मांडल्या. महानगरपालिका, महावितरण, आरोग्य विभाग, धम्मचक्र आयुक्त कार्यालय आदी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस पोलीस उप आयुक्त वृष्टी जैन,पोलीस उप आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, दिलीप पवार, वाहतूक शाखेचे मनोज यादव, महापालिकेच्या विना पवार, कपिल चोपडे, ओंकार फटे, धर्मादाय आयुक्त कार्यालय, तसेच महावितरण , अग्नीशामक दलाचे अधिकारी, तसेच डॉ. कमलाकर माने, सिव्हिल हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिक्षक, आर.टी.ओ.चे. स्वप्निल गिरी, सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
९ उत्कृष्ट गणेश मंडळांना गणराया पुरस्काराचे वितरण
पोलीस आयुक्तालयामार्फत शहर परिसरातील टिळक चौकातील मानाचा टिळक गणपती मंडळ, दमानी नगर येथील लोकसेवा गणेशोत्सव मंडळ, लष्कर येथील जय तिरुपती क्रीडा सेवा मंडळ, एकता नगर सार्वजनिक गणेश मंडळ, एमआयडीसी येथील सिद्ध रामेश्वर क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ , आकाशवाणी येथील विघ्नेश्वर मित्र मंडळ, सोरेगाव येथील चौडेश्वरी गणेशोत्सव मंडळ, होडगी रोड येथील भैरवनाथ गणेश उत्सव मंडळ आणि बाळे येथील खडक गल्ली गणेश मंडळ या ९ गणेश मंडळांना गणराया पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
Post Views: 15