Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महा-उपलब्धी’ अॅपमुळे निवृत्तीवेतनविषयक सेवा मोबाईलवरच उपलब्ध

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा व माहिती अधिक सुलभपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागामार्फत ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेत लेखा व कोषागारे विभागाच्या सचिव श्रीमती रिचा यागला तसेच संचालक, लेखा व कोषागारे श्रीमती दीपा देशपांडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. ‘महा-उपलब्धी’ अॅपच्या विविध सुविधा, त्याचा वापर करण्याची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा प्राप्त करण्याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
निवृत्तीवेतनधारकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असल्याने कार्यशाळेचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले. प्रत्येक सत्रात सुमारे ४०० निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अॅपबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली तसेच विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्यातील विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. ‘महा-उपलब्धी’ अॅप तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आयोजित कार्यशाळेबाबत संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. निवृत्तीवेतनविषयक सेवा डिजिटल माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त व सोयीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅपवर नोंदणी न झाल्यास निवृत्तीवेतन सेवांवर परिणाम नाही
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वैभव राऊत यांनी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना आवाहन केले की, तांत्रिक अडचणींमुळे किंवा स्मार्टफोन उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या निवृत्तीवेतनधारकास ‘महा-उपलब्धी’ अॅपवर नोंदणी करता आली नाही, तरी त्यांची निवृत्तीवेतनाशी संबंधित कोणतीही सेवा बंद होणार नाही किंवा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. निवृत्तीवेतनविषयक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहतील.
अॅपवर नोंदणी न झाल्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच निवृत्तीवेतनासंदर्भात अनधिकृत स्रोतांकडून अथवा अप्रमाणित माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय किंवा तालुका उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. राऊत यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वैभव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन सहायक संचालक श्री. रोहन जाधव, परिविक्षाधीन सहायक संचालक श्री. नितीन कानवट, अपर कोषागार अधिकारी श्री. रणजित कदम, श्री. रामकृष्ण डंके, श्री. निलेश साखरे यांच्यासह जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सुमारे ८०० निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग, विविध निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यशाळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. निवृत्तीवेतनविषयक सेवा डिजिटल माध्यमातून अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘महा-उपलब्धी’ अॅप हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.
00000
Post Views: 20
Previous Post

नेताजी प्रशालेच्या शिवा हडपदला सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्णपदक

Next Post

सह्याद्रीच्या तृतीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठ परीक्षेत दरारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सह्याद्रीच्या तृतीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठ परीक्षेत दरारा

ताज्या बातम्या

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

October 7, 2026
विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

October 7, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

October 7, 2026
‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

October 7, 2026
२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1313025

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!