सांगोला – महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी (ता.सांगोला) येथील हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले कलाशिक्षक प्रमोद अरविंद डोंबे यांना जाहीर झाला आहे. पुणे विभागातून विशेष कला शिक्षक गटात त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांनी केलेले कार्य आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन राज्य निवड समितीने त्यांची निवड केली आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रमोद डोंबे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Views: 8