Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांचा विचार करून तयार करावा. आषाढी व कार्तिकी वारीसह सर्व एकादशी आणि वर्षभरातील भाविकांची संख्या विचारात घेऊन गर्दीचे नियोजन, दर्शन व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
 पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला, संग्राम पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले की, यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३२ लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी दर्शनाची रांग किमान २२ किलोमीटरपर्यंत गेली होती. सद्यस्थितीत पंढरपूर शहराची ३० ते ३५ लाख भाविकांची गर्दी हाताळण्याची क्षमता नाही. त्यामुळे प्रस्तावित कॉरिडॉरच्या माध्यमातून ही क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या कालावधीत दर्शन रांगेत किमान दोन लाख भाविक सामावू शकतील, अशी व्यवस्था विकसित करावी.
चंद्रभागा नदीकाठचा वाळवंट परिसर हा भाविकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. वारीच्या काळात हजारो भाविक या ठिकाणी पूजा, भजन आणि विठ्ठल आराधना करतात. त्यामुळे वाळवंटाचा विकास करताना मूळ वाळवंटाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना अयोध्येतील शरयू नदीवरील घाटांच्या धर्तीवर घाटांची निर्मिती करावी, अशी सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी केली.
पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने दोन खासगी आर्किटेक्चर एजन्सींनी बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर त्यांनी संबंधित एजन्सींना भाविकांची भविष्यातील वाढती संख्या, दर्शन व्यवस्था, सुरक्षितता, धार्मिक परंपरा आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा समन्वय साधून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
———————-
चौकट : (दर्शन मंडपाच्या कामाचाही कॉरिडॉरमध्ये समावेश करण्याची सूचना)
राज्य शासनाने पंढरपूर कॉरिडॉरसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दर्शन मंडपासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२९ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले कामही कॉरिडॉरच्या एकत्रित आराखड्यात समाविष्ट करावे. दर्शन मंडपात भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दर्शन रांगेची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
————————
चौकट : ( विठ्ठल मंदिराच्या शिखरापेक्षा उंची जास्त नको)
कॉरिडॉरअंतर्गत नवीन इमारती किंवा अन्य बांधकामे करताना कोणत्याही इमारतीची किंवा स्ट्रक्चरची उंची श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य शिखरापेक्षा अधिक असू नये, याची काळजी घ्यावी.
Views: 8
Previous Post

मदुराई येथे दीप लावल्यामुळे पंढरपूरात आनंदोत्सव

Next Post

मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

बार्शी शहराला टँकरने पाणीपुरवठा करा –आ. दिलीप सोपल

November 29, 2026
स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

November 29, 2026

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

November 29, 2026
फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

November 29, 2026
माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

November 29, 2026
जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

November 29, 2026
गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

November 29, 2026
मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1579949

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!