पंढरपूर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मदुराई येथे शनिवारी टेकडीवरती दीप लावला गेला. त्या प्रित्यर्थ आनंदोत्सव म्हणून येथील गोपाळकृष्ण मंदिरात हिंदू महासभेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या साजरा करण्यात आलेलाआनंदोत्सवा संदर्भातील सविस्तर माहिती देताना हिंदू महासभेचे अभयसिंह कुलकर्णी यांनी सांगितले की,मदुराई येथे टेकडीवर दीप लावण्याच्या बाबतीत भला मोठा न्यायालयीन संघर्ष होऊन, हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयाद्वारे विजय मिळाला. दरम्यान न्यायालय हुकमाप्रमाणे शनिवारी तेथे सदर दीप प्रज्वलन करण्यात आले. तो विजय उत्सव साजरा करण्यासाठी व तेथील हिंदूंच्या लढ्याला पंढरपुरातून प्रतिकात्मक साथ देण्यासाठी, पंढरपुरातील मुख्य चौक चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
या दीपोत्सवा मध्ये हिंदू महासभेचे अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर, यशवंत बेणारे, बापूसाहेब उंडाळे, मंदिर संरक्षण समितीचे गणेश लंके, गोपाळ कृष्ण मंदिराचे मालक सागर बडवे, डाँ.दुर्गेश इचगांवकर, शिवप्रतिष्ठानचे राजाभाऊ बडवे, प्रमोद नगरकर आदींसह मान्यवर मंडळी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















