बार्शी – बार्शी तालुक्यातील १६ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यातील १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्यात आले आहेत. तसेच भोयरे, गुळपोळी, खडकलगाव, धसपिंपळगाव आदी गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने रस्तापूर, तांबेवाडी, शेलगाव (व्हळे,) गोरमाळे, शेलगाव (मा.,) रातंजन, धामणगाव( आ.,) भोयरे, धामणगाव( दु), ईरले, धामणगाव (दु.), यावली आणि मांडेगाव आदी गावांसह एकूण १६ गावांमध्ये विहिरी व बोअरवेल अधिग्रहणाची कार्यवाही केली आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत.