बार्शी – शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उजनी-बार्शी नवीन पाईपलाईनच्या कामाला वेग आल्याचे दिसत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करताना जुन्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या. जुन्या जलवाहिनीचे नुकसान होऊन गळती निर्माण होऊ नये आणि सध्याच्या पाणीपुरवठ्यात अडथळा येऊ नये, यासाठी काळजीपूर्वक काम करण्यास त्यांनी सांगितले. पाईपलाईनचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबतही त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कामातील अडचणी दूर करून बार्शीकरांना लवकर पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यावर त्यांनी भर दिला.
Post Views: 10