सांगोला – विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे आयोजित पुणे विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय, जवळे येथील १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेत मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळ, चपळता, जिद्द आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. या यशासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रा.ए.के.पाटील, विजय चडचणकर, विजय लांडगे, कुलभूषण देशमुख यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, उपाध्यक्ष अरुण घुले, सचिव सुभाष लऊळकर, प्राचार्य बाळासाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांत गोरे, पर्यवेक्षक संतोष शेटे यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post Views: 15