सोलापूर – जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांचे कामकाज अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजण्याऐवजी सकाळी ११ वाजता सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे सांगोला तालुकाप्रमुख दादासाहेब भगवान लवटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अध्यक्षांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा साधारणपणे तीन महिन्यांतून एकदा आयोजित केली जाते. त्यामुळे या सभांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, दुष्काळसदृश परिस्थिती, विकासकामे आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, सभा दुपारी सुरू होत असल्याने चर्चेसाठी उपलब्ध वेळ अपुरा पडत असल्याचा मुद्दा लवटे यांनी उपस्थित केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी सभा सकाळी लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

चौकट
रात्री नऊपर्यंत सभा, तरीही प्रश्न अनुत्तरित?
मागील सर्वसाधारण सभा सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. एवढा वेळ कामकाज चालूनही वेळेच्या मर्यादेमुळे अनेक सदस्यांना आपापल्या मतदारसंघांतील महत्त्वाचे प्रश्न मांडता आले नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सभागृहात प्रभावीपणे मांडण्याची संधी मर्यादित होत असल्याचे लवटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.