सोलापूर – ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली, तर त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकतो. याच उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’ला उत्साहात सुरुवात झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री यापुरता मर्यादित न राहता, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जात आहे.
( टीप मेल वरील फोटो लावणे विनंती)
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, सचिन जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि अभियानातील प्रतिनिधी उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटनानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. त्यांनी स्वामिनी महिला बचत गटाच्या स्टॉलवरून विविध उत्पादनांची खरेदी केली. यामुळे बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहन मिळाले. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची गुणवत्ता, त्यांची विक्री आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित झाली.
ग्रामीण भागातील महिलांकडे कौशल्य आणि उत्पादननिर्मितीची क्षमता आहे. मात्र, तयार केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, विक्री वाढविणे आणि उत्पादनांची ओळख निर्माण करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा महोत्सवांमुळे महिला उद्योजिकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते.महिला सक्षमीकरणाचा खरा परिणाम केवळ स्टॉल उभारण्यात नसून, त्या स्टॉलवरील उत्पादनांना नियमित ग्राहक मिळण्यात आणि त्यातून महिलांचे उत्पन्न वाढण्यात आहे. त्यामुळे उत्पादनांचा दर्जा, आकर्षक पॅकेजिंग, बाजारपेठेशी जोडणी आणि विक्रीचे सातत्य या बाबींवर भर दिल्यास ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव’ ग्रामीण महिला उद्योजिकांसाठी आर्थिक प्रगतीची महत्त्वाची संधी ठरू शकतो.
कोट
उत्पादन चांगले, पण पॅकेजिंगही आकर्षक हवे!
महोत्सवातील सर्व महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी महिलांशी संवाद साधून त्यांनी उत्पादननिर्मिती, गुणवत्ता, विक्री आणि बाजारपेठेतील संधी यांची माहिती घेतली. उत्पादनांची गुणवत्ता चांगली असली, तरी ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक पॅकेजिंग, प्रभावी सादरीकरण आणि ब्रँडिंग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवण्याबरोबरच त्याचे पॅकिंग अधिक आकर्षक आणि व्यावसायिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढण्यास आणि उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होऊ शकते. पुढील महोत्सवांमध्ये उत्पादनांचे पॅकेजिंग अधिक दर्जेदार करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
कोट
उत्पादननिर्मितीपासून विक्रीपर्यंत महिलांनी पुढे यावे
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे यांनी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. महिलांनी केवळ वस्तू तयार करण्यापुरते मर्यादित न राहता विक्री, विपणन आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन उत्पादननिर्मिती करता येते. मात्र, या उत्पादनांना नियमित ग्राहक मिळणे, विक्रीचे सातत्य टिकविणे आणि उत्पन्नात वाढ करणे यासाठी बाजारपेठेशी जोडले जाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने दिवाळीसारख्या सणाच्या काळात आयोजित होणारे महोत्सव महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
चौकट
स्थानिक उत्पादनांच्या खरेदीतून स्वावलंबनाला हातभार
क्मिणी दिवाळी महोत्सवा’त महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून महिलांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासोबतच थेट विक्रीची संधी मिळत आहे. नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
Post Views: 10