सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत डी.एस.टी.एस. मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा जलतरणपटू शुभम वीरेश अंगडी याने अप्रतिम कामगिरी करत पाच पदके पटकावली.
संगमेश्वर रात्र महाविद्यालय यांच्या यजमानपदाखाली मार्कंडेय जलतरण तलावावर झालेल्या या स्पर्धेत शुभमने जिद्द आणि कौशल्याचे प्रदर्शन करत एक रौप्य आणि चार कांस्य अशी पाच पदके आपल्या नावावर केली. त्यास क्रीडा समन्वयक डॉ. सुनील मठपती यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, विश्वस्त प्रा. बी. व्ही. शेटे आणि प्राचार्य डॉ. एम. एस. कलशेट्टी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील कामगिरी :
१५०० मीटर फ्रीस्टाईल (रौप्य), २०० मीटर वैयक्तिक मेडले(कांस्य), ८०० मीटर वैयक्तिक मेडले (कांस्य), हायबोर्ड डायव्हिंग (कांस्य), १ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग (कांस्य).
—–





















