पंढरपूर – महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पालकमंत्री जयाभाऊ चषक २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.येथील अभिराज उबाळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील नामांकित क्रिकेट संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात पार पडला.
पंढरपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार मैदान उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटी रुपये मैदानासाठी मंजूर केले आहेत. लवकरच पंढरपूरच्या खेळाडूंना अत्याधुनिक असे मैदान उपलब्ध करून देण्यात येईल असे घोषणा यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे, समाजसेवक नाना कदम, पैलवान सिद्धनाथ कोरे, डीव्हीपी बँकेचे संचालक परवेज मुजावर, कनिष्क सर्वगोड, मुन्ना बागवान, प्रतीक सर्वगोड, आकाश बंदपट्टे, गणेश उबाळे, आशिष उबाळे, संतोष डोंगरे, शंकर सुरवसे, इम्रान मनेरी, गणेश साळुंखे, एडवोकेट किशोर खिलारे, दिनेश पांढरे, लाला पेंटर, पत्रकार सचिन कांबळे, कामगार नेते गुरु दोडिया, पैलवान सचिन बंदपट्टे, यांच्यासह हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभिराज उबाळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे पंढरपुरातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाच्या क्रिकेटचा आनंद घेता आला असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
———————-
चौकट : ( स्पर्धेचा निकाल )
विजेता संघ : ४०१६ क्रिकेट क्लब, पंढरपूर, उपविजेता संघ : मातोश्री क्रिकेट क्लब, धाराशिव, तृतीय क्रमांक : स्वयंभू क्रिकेट क्लब, सांगली, चतुर्थ क्रमांक : राजनंदिनी दोस्ती क्रिकेट क्लब, पारनेर, जि. अहिल्यानगर.
Post Views: 30