सोलापूर – शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी केंद्रीत अध्यापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर येथील चतुरबाई श्राविका विद्यालय, होटगी रोड येथील सहशिक्षिका संगीता गंगाधर घोंगडे यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) कडून शिक्षण क्षेत्रातील आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या शैक्षणिक वर्तुळात अभिमानाचे वातावरण आहे.
सौ. घोंगडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अध्यापन अधिक रंजक व परिणामकारक केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘एससीईआरटी’ ने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Views: 10