सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्या केली.हे घटना सोलापूर ते मोहोळ लोहमार्गावरील पाकणी जवळ सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
प्रेम राजू राठोड (वय 33 रा. बसवेश्वर नगर,देगाव उ.सोलापूर)असे मयताचे नाव आहे.शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला होता.याची माहिती मिळाल्यानंतर सलगरवस्तीच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयकडे पाठवून दिले.
मयत प्रेम राठोड हा विवाहीत असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.तो रिक्षा चालक होता. आत्महत्येपूर्वी त्याने फोन करून वडीलांन सांगितले होते.या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत.
Views: 13